लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्यात काहीतरी बिनसले आहे. त्यामुळे बाबा रामदेव हे नाराज आहे. त्यामुळे योगी सरकारला जोरदार दणका दिलाय. पतंजली आयुर्वेद लिमिटेडने उत्तर प्रदेश राज्यातील प्रस्तावित पतंजली फूड पार्क अन्य ठिकाणी हलवण्याची तयार सुरू केलेय. याबाबत ट्विटही करण्यात आलेय. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि पतंजली योगपीठाचे सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील प्रस्तावित मेगा फूड पार्क अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय पतंजलीने घेतला आहे. श्रीराम आणि कृष्ण यांच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा संकल्प राज्य सरकारच्या उदासीसनतेमुळे अपूर्णच राहणार आहे, असे आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटमध्ये म्हटलेय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वृत्ती चांगली नाही. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून पतंजलीचा मेगा प्रोजेक्ट अन्य ठिकाणी हलवावा लागत असल्याचे म्हटलेय.



२०१६मध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नोएडामध्ये यमुना एक्स्प्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरणामध्ये पतंजली फूड पार्कचे भूमिपूजन केले होते. फूड पार्क सुरू झाल्यानंतर राज्यातील जवळपास १० हजार लोकांना याठिकाणी नोकरी मिळेल, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. या प्रोजेक्टमध्ये पतंजली ग्रुप १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती.