राम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
नवी दिल्ली : डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणात १० - १० अशा २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अगोदर डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीमला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र कोर्टाने आता ती २० वर्षाची केली आहे.
या सगळ्या प्रकरणावर योग गुरू बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही शक्तीशाली व्यक्ती असला तरी तो कायद्याच्या कारवाईतून सुटू शकत नाही, हे न्यायालयानं दाखवून दिलं आहे. धर्माच्या नावाखाली अधार्मिक गोष्टी घडू नयेत. न्याय मिळायला उशीर होऊ शकतो, पण न्याय मिळतोच, असं बाबा रामदेव म्हणालेत.