मुंबई : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पाच कंपन्यांचे आयपीओ (IPO) लॉन्च होणार आहेत. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली फूड्सचे (Patanjali Foods) शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. आता बाबा रामदेव म्हणाले की पतंजली ब्रँडच्या इतर कंपन्यांचे आयपीओ लवकरच लॉन्च केले जातील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या कंपन्यांचा IPO येणार आहे त्यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांत या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड होतील.
 
बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत रुची सोया 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. ही कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्ट झाली होती. यावर्षी कंपनीचे नाव रुची सोया वरून बदलून पतंजली फूड्स करण्यात आले. पतंजली फूड्सच्या स्टॉकची किंमत दर आठवड्याला वाढत आहे.


पतंजली फूड्सच्या शेअरची किंमत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतंजली फूड्स स्टॉक मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. गेल्या एका महिन्यात शेअर्सच्या किमतीत 12.89 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याची किंमत 53.66 टक्क्यांनी वाढली आहे. दोन वर्षांत 105 टक्के परतावा दिला आहे. आता गेल्या पाच वर्षांतील यातून मिळणारा परतावा पाहता पतंजली फूड्सच्या समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना 5,400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.


तीन वर्षांत मोठी झेप


शुक्रवारी, या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, पतंजली फूड्सचे शेअर्स 0.38 टक्क्यांनी वाढून 1,380 वर पोहोचले. सध्या पतंजली फूड्सचे मार्केट कॅप (Mcap) सुमारे 50,000 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2017 मध्ये त्याच्या शेअरची किंमत सुमारे 26 रुपये होती.


सप्टेंबर 2020 पर्यंतच्या तीन वर्षांत या शेअरची किंमत 613 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, शुक्रवारी, त्याच्या समभागांनी 1,398 या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. पतंजली फूड्स ही खाद्यतेलाचे उत्पादन करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे.


तज्ञांचा अंदाज


बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ पाहून रिसर्च फर्म्सही या खरेदीला फायदेशीर करार सांगत आहेत. पतंजली फूड्सला BUY रेटिंग देत देशांतर्गत संशोधन संस्था Antique ने त्यांच्या शेअर्ससाठी प्रति शेअर रु. 1725 चे लक्ष्य ठेवले आहे.