Baba Vanga ची भविष्यवाणी ठरतायत खरी,भारताविरूद्धचं भाकित काय? जाणून घ्या
बाबा वेंगाची दोन भाकित ठरली खरी, भारतासाठी काय भविष्यवाणी केलीय? खरंच या भाकिताचा देशाला इतका मोठा धोका आहे का?
मुंबई : बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा (Baba Vanga) हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ते आहेत. असे म्हणतात की दृष्टी नसतानाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येतं, ही त्यांना देवाने दिलेली एक मोठी देणगी आहे. बाबा वेंगा (Baba Vanga Prediction) यांनी केलेल्या आतापर्यंत 2 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत, तर इतर 4 अजून खऱ्या ठरायच्या बाकी आहेत. या भविष्यवाणीत त्यांनी भारतासाठीही भाकित केलं होतं.हे भाकित काय आहे? तसेच याचा भारताला किती धोका असणार आहे,ते जाणून घेऊय़ात.
दोन भाकित ठरली अचूक
ब्रिटीश वेबसाइट 'द सन'च्या रिपोर्टनुसार, बाबा वेंगा (Baba Vanga Prediction) यांनी 2022 या वर्षाच्या संदर्भात अनेक भविष्यवाणी केली आहेत. त्यापैकी 2 आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. यापैकी पहिली म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये भीषण पुराचा अंदाज होता. तर दुसरी म्हणजे अनेक शहरांतील दुष्काळ आणि जलसंकट.
पुराचं संकट
एका अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्यावर या वर्षाच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे तेथे भीषण पूर आला होता. त्यामुळे त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली होती.
दुष्काळाचं संकट
मोठ्या शहरांना दुष्काळ आणि पाण्याचा तडाखा बसेल, असे आणखी एक भाकीत त्यांनी केले होते. या भाकितात त्यांनी स्थळ आणि वेळ स्पष्टपणे नमूद केली नसली, तरी युरोपमध्ये हे भाकीत आता खरे ठरताना दिसत आहे. प्रचंड हिमनद्या आणि पाण्याने वेढलेले ब्रिटन, इटली आणि पोर्तुगाल या देशात सध्या भीषण दुष्काळ पडला असून, लोकांना पाणी वाचवण्यास सांगितले जात आहे.
ब्रिटनमध्ये गेल्या शुक्रवारी अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडच्या दक्षिण-पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्वेकडील भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे आणि लवकरच दुष्काळग्रस्त घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान विनाशकारी दुष्काळाचा सामना करणारा ब्रिटन हा एकमेव देश नाही. इटली आणि पोर्तुगाल देखील या दुष्काळाचा सामना करत आहे. नागरीकांकडे पाणी वाचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे 1950 नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ इटलीत आहे.
विषाणूचा प्रादुर्भाव
बाबा वेंगा (Baba Vanga Prediction) यांनी या वर्षासाठी आणखी 2 भविष्यवाण्या केल्या आहेत. यापैकी एक अंदाज असा आहे की, यावर्षी रशियाच्या सायबेरिया प्रदेशात एक अतिशय धोकादायक विषाणू आढळून येईल. जो जगात एक नवीन धोकादायक रोग पसरवेल आणि लाखो लोकांचा मृत्यू होईल.
भारतावर मोठं संकट
भारतावर यावर्षांत टोळधाडीचं संकट ओढवणार आहे. यावर्षी जगात तापमानात घट होणार असून, त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. हिरवळ आणि अन्नामुळे, टोळांचे थवे भारतावर हल्ला करतील, ज्यामुळे पिकांचे गंभीर नुकसान होईल आणि देशात दुष्काळ पडणार आहे.
दरम्यान बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे आता भारताबाबत केलेल हे भाकित आता कितपत खरे ठरतं हे भविष्यात कळणार आहे. पण त्यांचे अनेक अंदाज खरे ठरताना पाहून अनेकांना भीती वाटतं आहे.