नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने सोमवार बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. आता बचत खात्यावरील व्याजदर ०.५ टक्क्यांनी कमी केला आहे. ३१ जुलैपासून हा नवीन व्य़ाजदर लागू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकने दिलेल्या माहितीनुसार बचत खात्यामध्ये १ कोटी रुपयांवर ४ टक्के व्याजदर दिला जात होता. पण आता ३.५ टक्के व्याजदर दिला जाईल.


पण जर तुमच्या खात्यात १ कोटी रुपये असतील तर त्यावर ४ टक्केच व्याज दिला जाईल. तर एसबीआयने काही दिवसांपूर्वी मॅच्युरिटीसाठी देखील टर्म डिपॉजिट रेटमध्ये ५० बेसिस पॉईंटची कपात केली होती.


म्हटलं जातंय की, एसबीआयच्या 2-टियर सेविंग बँक रेटनुसार जवळपास ९० टक्के ग्राहकांना सरळ नुकसान होणार आहे. कारण एसबीआयचे अधिक खात्यांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉजिट आहे. अशात या कस्टमर्सला ०.५ टक्के इंटरेस्ट कमी मिळेल.