Bageshwar Baba Marriage: मध्य प्रदेशमधील धतरपूर येथील बागेश्वर धाममधील (Bageshwar Dham) पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या लग्नासंदर्भातील चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. सोशल मीडियावर पंडित धीरेंद्र शास्त्रींच्या लग्नाबद्दलची एक बातमी व्हायरल झाली आहे. यामध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत असलेली एक तरुणी बागेश्वर बाबांशी लग्न करण्यासाठी गंगोत्री धामपासून बागेश्वर धामपर्यंत डोक्यावर कलश घेऊन पदयात्रा करणार आहे. 16 जून रोजी ही तरुणी बागेश्वर धामला पोहचणार असून तिथे ती धीरेंद्र शास्त्रींची भेट घेणार आहे. या तरुणीचं नाव शिवरंजनी तिवारी (Shivranji Bageshwar) असं आहे. विशेष म्हणजे या लग्नासंदर्भातील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींनीही उत्तर दिलं आहे.


तिने प्रसारमाध्यमांना काय सांगितलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवरंजनीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने आपली एक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बागेश्वर धामपर्यंत पायी जाणार असल्याचं सांगितलं. तसेच आपली इच्छा काय आहे ही मी बागेश्वर धाममध्ये धीरेंद्र शास्त्रींना भेटल्यावरच सांगणार आहे. तिने यावेळेस धीरेंद्र शास्त्रींचा उल्लेख 'सरकार' असा केला. शिवरंजनीला लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने थेट उत्तर देणं टाळलं. "बागेश्वर धाम सरकारला सर्व काही ठाऊक आहे. जे होईल ते योग्य वेळी सांगितलं जाईल," असं शिवरंजनी म्हणाली. तसेच एका प्रश्नाला उत्तर देताना शिवरंजनीने धीरेंद्र शास्त्रींचा उल्लेख 'प्राणनाथ' असा करताना, "त्यांना माझ्या मनातील सर्व गोष्टी ठाऊक आहेत," असं विधान केल्याचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.


कोण आहे ही तरुणी?


सोशल मीडियावरील काही युझर्सने केलेल्या दाव्यानुसार शिवरंजनीला बागेश्वर धाममध्ये लग्न करण्याची इच्छा असून त्यासाठीच ती ही पदयात्रा करत आहे. शिवरंजनी एक युट्यूबर आणि भजनं सादर करणारी गायिका आहे. शिवरंजनी ही स्वयंघोषित सेलिब्रिटी आहे. आपल्या एका दौऱ्यादरम्यान ती नुकतीत इलाहाबाद आणि चित्रकूटमधील संतांबरोबर दिसून आळी होती. पुढील काही दिवसांमध्ये ती बागेश्वर धाममध्ये पोहचणार आहे. बागेश्वर धाममधील भक्तांना 16 जून रोजी शिवरंजनी धीरेंद्र शास्त्रींना भेटल्यानंतर तिच्या लग्नासंदर्भातील खुलासा केला जाईल का याबद्दल उत्सुक आहेत. यापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांचं नाव प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांच्याशी जोडण्यात आलं होतं.


धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले?


धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबांना लग्नासंदर्भात सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबांनी हात जोडून, "मी तुम्हाला आहे तसा समाधानी, आनंदी वाटत नाही का?" असा प्रतिप्रश्न विचारला. लग्न न करता आपण प्रसन्न आहोत. माझ्या चेहऱ्यावरही सुरकुत्या दिसाव्यात अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्नही बागेश्वर यांनी या प्रश्नाला उत्तर देताना विचारला.