Dhirendra Krishna Shastri Controversy: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री असा वाद सुरु असतानाच आता या वादामध्ये भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्याने उडी घेतली आहे. नागपूरमधील (Nagpur) कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना जाहीर आव्हान दिल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढल्याचा दावा केला आहे. 'अंनिस'ने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना तुमच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवा असं जाहीर आव्हान दिलं असून हे आव्हान धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकारलं आहे. वाद सुरु असतानाच आता मध्य प्रदेशमधील भाजपाच्या एका नेत्याने धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना पाठिंबा दिला आहे. 


विजयवर्गीय काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना समर्थन दिलं आहे. विजयवर्गीय यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. सनातन धर्मामध्ये अनेक हिंदू महात्मा होऊन गेले, असंही विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी रात्र संत श्री टाटमबरी सरकार यांच्या दर्शनासाठी विजयवर्गीय बडवाह येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री प्रकरणासंदर्भात भाष्य केलं.


मी मुलाखत पाहिली आहे


मी बाबांची मुलाखत पाहिली आहे. हिंदू संत धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी हा माझा चमत्कार नसून माझ्या इश्वराचा चमत्कार आहे. माझा हनुमान आणि सन्यास घेतलेल्या बाबांवर विश्वास आहे. सर्वकाही त्यांच्या कृपेने होतं. मी तर त्यांचा छोटासा साधक आहे, असं विजयवर्गीय म्हणाले. हिंदू महात्मांबद्दल असं काही झालं की लोक प्रश्न उपस्थित करतात. जावरा येथील दर्ग्याबद्दल आजही कोणी प्रश्न उपस्थित करत नाही. तिथे लोक जमीनीवर लोळतात, त्यांना मारलं जातं मात्र त्याची चर्चा होत नाही, असं विजयवर्गीय म्हणाले आहेत.


नेमका वाद काय?


नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रामकथा कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपस्थित होते. यावेळी 'अंनिस'चे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जाहीर आव्हान दिलं. हा सगळा प्रकार 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेल्याचं कॅमेरात कैद झालं. यामुळे त्यांच्याकडे खरंच काही दैवीशक्ती आहे का? असा प्रश्न विचारला जात असून 'अंनिस'नंही त्यांना थेट आव्हान दिलं आहे.


'अंनिस'ची पोलीस कारवाईची मागणी


अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर धामच्या महाराजांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. बागेश्वर धामचे महाराज अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप 'अंनिस'ने केला आहे.


कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री?


बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छत्तरपूरमधील बागेश्वर धाम मंदिराशी जोडलेले महंत आहेत. त्यांचे देशभरामध्ये हजारो भक्त आहेत. छत्तरपूरमधील गाडा गावात त्यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या अनुयायांची गर्दी होते.