श्रीनगर: शाळांमध्ये विद्यार्थी गणित, विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र असे विषय शिकायला जातात. पण काही शाळांमध्ये चिमुरडी मुलं स्वतःचा जीव कसा वाचवायचा, हे सगळ्यात आधी शिकतात. भारत-पाकिस्तान सीमारेषेवर असलेल्या मेंढर तालुक्यातील बालाकोट सेक्टरमध्ये अशीच एक शाळा भरते. ही शाळा नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. पाकिस्तानकडून गोळीबार आणि रॉकेट हल्ला झाल्यास शाळेतले चिमुकले बंकरमध्ये जाऊन बसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ला झाल्यानंतर शाळेत सायरन वाजतो. सायरन वाजला याचा अर्थ गोळीबाराला सुरुवात झाली आहे. मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मुलं बंकरमध्ये लपतात. शाळेच्या बाहेरच असे बंकर्स तयार करण्यात आले आहेत. सीमाभागात लष्कराकडून अशा शाळा चालवल्य़ा जातात. येथील विद्यार्थी आणि शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.