लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बलारामपूरमधील निर्भयावर सामूहिक बलात्कार झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय दलीत विद्यार्थिनीवर काही नराधमांनी बलात्कार केला होता. त्यानंतर उपचारासाठी लखनऊच्या हॉस्पीटलध्ये पोहोच्याआधीचे तिचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील नरसिहपूरमध्येही एका दलित महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर पीडितेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. 


मध्यप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार


उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणी योगी अदित्यनाथ यांनी कारवाई केली आहे. हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांच्यासह पाच पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्यासह तत्कालीन क्षेत्रअधिकारी राम शब्द, प्रभारी निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, वरिष्ठ उपनिरीक्षक जगवीर सिंह, कॉन्स्टेबल हेड मोहर्रीर महेश पाल यांना निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास करण्यात येत आहे. 


दरम्यान वादी प्रतिवादांची नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्यात येणार आहे. हाथरसमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत भयावह आहे. बुलगाडी गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


काल निर्भयाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन आणि इतर खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली. हाथरसमध्ये माध्यम प्रतिनिधींनाही प्रवेश दिला जात नाहीये. निर्भयाच्या कुटुंबीयांना कुणालाही भेटू दिलं जात नसल्यामुळे प्रशासनाकडून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.