नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल्या सगळ्या मोठ्या बाजारपेठा आज बंद आहेत. दिल्लीतल्या व्यापाऱ्यांनी सिलींग विरोधात ४८ तासांचा बंद पुकारलाय. 


२५ हजार दुकाने बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळपासून सुरुवात झाली असून जवळपास २५ हजार दुकाने बंद आहेत. रहिवाशी भागात असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांच्या अनधिकृत मालमत्ता नियमित करण्यासाठी एक विशिष्ठ रक्कम दंडाच्या रुपानं भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.




दंड भरण्यास नकार


व्यापारी हा दंड भरण्यास तयार नाहीत. जे व्यापारी दंडाची रक्कम भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तशी कारवाईही सुरू झालीय. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवल्यानं राजधीनीत आज बंद ठेवलाय.