हॉस्पीटलमध्ये रुग्ण सिरिअस, ट्रॅफिकमध्ये अडकलेला डॉक्टर रुग्णाला वाचवण्यासाठी 3 किलोमीटर धावला, Video व्हायरल
ही बातमी वाचून तुम्हीही म्हणाल... डॉक्टर खरच देव असतात
Doctor Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ पाहून विसरून जातो, तर काही व्हिडिओ मनाला स्पर्श करुन जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला आहे.
काय आहे त्या व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक डॉक्टर रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. या डॉक्टरांचं नाव गोविंद नंदकुमार (Govind Nandakumar MD) असं आहे. हॉस्पिटलमध्ये सिरिअस असलेल्या एका रुग्णावर शस्त्रक्रिया (Operation) करण्यासाठी डॉक्टर गोविंद निघालो होते. पण मध्येच त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
रुग्णाची अवस्था बिकट असल्याने डॉक्टर गोविंद यांना वेळेत हॉस्पीटलमध्ये पोहोचणं गरजेचं होतं. बंगळुरुमधली ही घटना असून डॉक्टर गोविंद याना सरजापूर इथल्या मणिपाल हॉस्पीटलमध्ये पोहोचायचं होतं. पण कनिंघन रोड ते सरजापूरदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होती. डॉक्टर गोविंद यांची कार या वाहतूक कोंडीत फसली आणि पुढे जाण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती. डॉक्टरांनी गुगल मॅपवर तपासलं असता त्यांना हॉस्पीटलला पोहचण्यासाठी किमान 45 मिनिटांची वेळ दाखवली जात होती. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त वेळ लागण्याची शक्यता होती.
त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ निर्णय घेतला. त्यांनी कार आणि ड्रायव्हरला तिथेच सोडत सरळ रस्त्यावरुन धावायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी त्यांची कार वाहतूक कोंडीत अडकली होती. त्या ठिकाणापासून हॉस्पीटल जवळपास तीन किलोमीटर दूर होतं. पण कसलीही पर्वा न करता डॉक्टर गोविंद तब्बल तीन किलोमीटर धावले आणि रुग्णालय गाठलं. त्यांनी स्वत:चं याचा व्हिडिओ बनवला आहे.
डॉक्टरांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. डॉक्टर गोविंद यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.