शशी थरूर यांच्या Hairstyleचा गणिताशी संबंध? बांगलादेशात व्हायरल होतय `हे` सूत्र
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतरही शशी थरुर चर्चेत
काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे लोकसभा खासदार शशी थरूर (shashi tharoor) हे सोशल मीडियावर (Social Media) कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या इंग्रजीमुळे (English) तर कधी गळ्यात घातलेल्या एअर प्युरिफायरमुळे शशी थरूर (shashi tharoor) ट्रेंडमध्ये असतात. सध्या काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे शशी थरूर हे सध्या चर्चेत होते. या निवडणुकीचा निकाल लागला आणि शशी थरूर यांचा निवडणुकीत पराभव झालाय. मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) हे काँग्रेसचे (Congress) नवे अध्यक्ष बनले आहेत. पण तरीही चर्चा शशी थरुर यांचीच होतेय. (Bangladesh teacher finds secret of mathematics is hidden in Shashi Tharoor Hairstyle)
सध्या शशी थरूर (shashi tharoor) हे त्यांच्या हेअरस्टाइलमुळे (Hairstyle) चर्चेत आलेत. थरूर यांच्या केशरचनामुळे विद्यार्थ्यांसाठी गणिताचे एक समीकरण (Equation) अगदी सोप्प झालंय. शशी थरूर यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. थरूर यांनी सांगितले की बांगलादेशातील एक शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या केसांच्या रेषेवरून क्वार्टिक फिट (quartic fit) हे सूत्र (formula) खूप चांगले समजावून सांगतातय. याच शिक्षकाने शशी थरूर यांना एक फोटो पाठवला, जो त्यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.
थरूर यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. आपलाच फोटो शेअर करत शशी थरुर यांनी म्हटलं की, बांगलादेशातील ढाका येथील गणिताचे शिक्षक जलज चतुर्वेदी यांचे एक पत्र आले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, 'माझ्या मते गणित फक्त संख्या जोडून शिकवू नये. हे आकड्यांपेक्षा काहीतरी अधिक आहे. इयत्ता 12वीच्या गणितासाठी क्वार्टिक फिटसाठी (quartic fit) तुमची हेअरस्टाईल उत्तम उदाहरण आहे.''
क्वार्टिक फिट (quartic fit) म्हणजे काय?
आपण सर्वांनी लहानपणी गणिताचा बहुपदी अभ्यास केला आहे. बहुपदी म्हणजे ती समीकरणे ज्यामध्ये गुणाकार, बेरीज, भागाकार आणि वजाबाकी , स्थिरांक आणि घातांक यांसारख्या गणिती क्रिया केल्या जातात. म्हणजेच 4x⁴+3x²+x-5 हे समीकरण आहे आणि यामध्ये x हा चल आहे, x वर लिहिलेली संख्या घातांक (Exponent) आहे आणि '5' हा स्थिरांक आहे. कोणत्याही समीकरणातील (Equation) सर्वोच्च घातांक 4 असेल तर त्याला इंग्रजीत क्वार्टिक फंक्शन (Quartic Function) म्हणतात. आलेखावर हे समीकरण मांडल्यानंतर काढलेली आकृती ही थरूर यांच्या केशरचनाप्रमाणेच आहे.