बंगळुरु शहरात बेण्णादूर नदीला प्रदुषणाचा विळखा
हा पांढरा शुभ्र थर नक्कीच बर्फाचा नाही. आणि हे दृश्यं कुठल्या युरोपमधल्या देशामधलंही नाही. तर नदीच्या पृष्ठभागावर साठलेला हा फेस आहे.
बंगळुरू : ही दृश्य बंगळुरू शहरातील आहेत, त्यामुळे तुमचा गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. कारण ही दृश्यंच तशी आहेत. हा पांढरा शुभ्र थर नक्कीच बर्फाचा नाही. आणि हे दृश्यं कुठल्या युरोपमधल्या देशामधलंही नाही. तर नदीच्या पृष्ठभागावर साठलेला हा फेस आहे.
ही दृश्य आहेत आपल्याच शेजारच्या कर्नाटक राज्यातली. बंगळुरु शहरात बेण्णादूर नदी आहे. या नदीवर हा पांढराशुभ्र फेस पसरला आहे. या नदीवर जिथे पहावं तिथे हा असाच पांढरा फेस दिसत आहे. नदीच नाही तर रस्त्यावरही हा फेस उडून आला आहे.
इथल्या प्रदुषणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिकही कमालीचे धास्तावले आहेत. विशेष म्हणजे याआधाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आरोग्याला घातक असलेल्या या समस्येवर तातडीनं उपाय करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.