मुंबई : जुलै महिना काही दिवसात सुरू होणार आहे. या महिन्यात सर्व खासगी आणि सरकारी बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत.  (Bank Holiday in July) अशा परिस्थितीत, जर आपल्याकडे पुढील आठवड्यात बॅंकेसंदर्भात काही महत्त्वाचे काम असेल तर आपल्या बँकेच्या सुट्ट्या (Bank Holiday) लक्षात घेऊन त्यासंबंधी कामाचे नियोजन करा. अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता.


जुलैमध्ये बँका 15 दिवस बंद राहतील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलीडे कॅलेंडरनुसार बँकांना रविवार आणि दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी जुलैमध्ये 6 दिवस सुट्टी असेल. ज्यामध्ये कोणतेही काम होणार नाही. तसेच, बँका आणखी 9 दिवस बंद राहतील. जरी या इतर सुट्ट्या देशभर एकत्र राहणार नाहीत, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या असतील. अशा प्रकारे, एकूण 15 दिवस बँकांची कामे होणार नाहीत. बँका कोठे आणि केव्हा बंद होतील हे जाणू घ्या.


जुलै 2021 मध्ये बँकांना सुट्टी


12 जुलै - कांग (रथयात्रा) / रथयात्रा-भुवनेश्वर आणि इंफाळ.
13 जुलै- भानु जयंती- गंगटोक.
14 जुलै - द्रुपका जयंती- गंगटोक.
16 जुलै - हरेला- देहरादून.
17 जुलै - यू तिरोट सिंग दिन / खार्ची पूजा - अगरतला / शिलाँग.
19 जुलै - गुरू रिनपोचे थुंगकर शेचू - गंगटोक.
20 जुलै - बकरीद - जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम.
21 जुलै - बकरीद (ईद-उल-जुहा) - आयझाल, भुवनेश्वर, गंगटोक, कोची आणि तिरुअनंतपुरम वगळता सर्व ठिकाणी बँका बंद असतील.
31 जुलै- केर पूजा- आगरतला.


जुलैमध्ये बँकांना साप्ताहिक सुट्टी


4 जुलै - रविवार.
10 जुलै - महिन्याचा दुसरा शनिवार.
11 जुलै - रविवार.
18 जुलै - रविवार.
24 जुलै - महिन्याचा चौथा शनिवार.
25 जुलै - रविवार.