जून महिन्यात 12 दिवस बँक बंद, महत्त्वाची कामं आजच करा प्लॅन
बँकेची काम आताच करून घ्या कारण जून महिन्यात 12 दिवस बँक बंद असणर
मुंबई : जवळपास सगळीच कामं आपण बँक किंवा ऑनलाइन केली जातात. मात्र तरीही चेक टाकणं किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बँकेची गरज भासते. तुमची बँकेची काही कामं असतील तर आताच प्लॅन करायला घ्या कारण पुढच्या महिन्यात 12 दिवस बँक बंद असणार आहे.
महाराणा प्रताप जयंती, श्री गुरु अर्जुन देव शहादत दिवस अशा अनेक कारणांमुळे बँक बंद राहणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सणसमारंभ असल्याने बँक हॉलिडे आहे. त्यामुळे तुमच्याकडे बँका कधी सुरू असणार हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरू शकतं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दरवर्षी बँक हॉलिडे कॅलेंडर जारी करते. त्यामध्ये प्रत्येक राज्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची माहिती असते. या कॅलेंडरमध्ये सुट्ट्या आणि बँकांची माहिती असते.
जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या यादीत दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे.भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवरही याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन तुमच्या राज्यातील बँका किती दिवस बंद आहेत ते पाहू शकता.
या सुट्ट्या सण किंवा विशेष प्रसंगी अवलंबून असतात. याचा अर्थ या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नसून संबंधित राज्यांतील सण किंवा दिवसावर अवलंबून असतात. फक्त प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवारी सामान्य सुट्टी असते.
बँक बंद असूनही तुम्ही तुमची अनेक महत्त्वाची कामं ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून करू शकता. बँकांच्या सर्व ऑनलाइन सेवा महिनाभर चालू असणार आहेत. बँकांच्या सुट्टीच्या दिवशी फक्त त्यांच्या शाखा बंद असतील, तर बँकेची एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटिंग मशिन सुरू असणार आहे.
सर्व बँकांच्या मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा देखील बँक सुट्टीच्या दिवशी सुरू असणार आहेत. तर, मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगच्या मदतीने, तुम्ही पैसे पाठवू शकतात किंवा पैशांचे इतर व्यवहार करू शकता.