मुंबई : ऑक्टोबर महिन्यात अनेक सण आहेत. यामुळे देशातील खासगी आणि सरकारी बँका बंद असणार आहेत. सण आणि उत्सव पाहता ऑक्टोबरमध्ये जवळपास 21 दिवस बँका बंद असणार आहे. या सुट्यांमध्ये दुसरा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. ज्यांना बँकांशी संबंधीत काही महत्वाची कामे असतील तर ती लवकर हुरकून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगली गोष्ट म्हणजे सुट्ट्या वारंवार किंवा कमी अंतराने नाहीत. यामुळे बँकांशी संबंधित काम करताना लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. या सुट्ट्यांमध्ये बँकेच्या शाखा बंद राहतील, परंतु एटीएम आणि रोख ठेवींसारख्या मशीन्स पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील. पैसे काढण्यात किंवा जमा करण्यात ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात कारण स्थानिक सण लक्षात घेऊन सुट्ट्या निर्धारित केल्या जातात.


रिझर्व बँकेने कॅलेंडर जाहीर केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्या सोडून 16 दिवस सुट्टी आहे. केंद्र सरकारने सुट्यांचे तीन भाग केलेत. 


ऑक्टोबर महिन्यातील सुट्यांची संपूर्ण यादी 


1 ऑक्टोबर 2021- हाफ ईयरली क्लोजिंग आणि बँक अकाउंट
2 ऑक्टोबर 2021- गांधी जयंती 
3 ऑक्टोबर 2021- रविवार
9 ऑक्टोबर 2021- दुसरा शनिवार
10 ऑक्टोबर 2021- रविवार
17 ऑक्टोबर 2021 – रविवार
19 ऑक्टोबर 2021 – ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलदुन्नबी/मिलाद-ए-शरीफ/बारावफात 
22 ऑक्टोबर 2021 – ईद-ए-मिलाद-उल-नबी 
 


ऑक्टोबरमधील शनिवार रविवार


3 ऑक्टोबर 2021- रविवार
9 ऑक्टोबर 2021- दूसरा शनिवार
10 ऑक्टोबर 2021- रविवार
17 ऑक्टोबर- रविवार
23 ऑक्टोबर 2021- चौथा शनिवार
24 ऑक्टोबर 2021- रविवार