मुंबई : जुलै महिना सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. प्रत्येक जण आपआपल्या सोयीने बँकेची आणि इतर आर्थिक व्यवहार करत असतात. तुम्ही जर जुलैमध्ये बँक व्यवहार करणार असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जुलै महिन्यात कामाच्या दिवसांपेक्षा सुट्ट्याच (Bank Holidays July 2022) जास्त आहेत. त्यामुळे खातेधारकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे आताच जाणून घ्या की जुलै महिन्यात बँक कामकाज केव्हा सुरु आणि केव्हा बंद असणार. (bank holidays 2022 july list know how many days and which day bank work closed)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जुलै महिन्यातील सुट्टींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण 16 दिवस बँक बंद असणार आहे. 


आरबीआयकडून सुट्ट्यांची 3 श्रेणीत विभागणी


आरबीआयने बँकाच्या सुट्ट्यांची (Bank Holidays In july 2022) 3 श्रेणीत विभागणी केली आहे. यामध्ये Negotiable Instruments Act, Real Time Gross Settlement Holiday और Banks Closing of Accounts याचा समावेश आहे.


राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये विशेष अशा सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. जुलैमध्ये केव्हा बँक बंद असणार हे  यादीद्वारे पाहुयात.  


सुट्ट्यांची यादी


1 जुलै : कांग (रथजात्रा)/ रथ यात्रा- भुवनेश्वर आणि इंफालमध्ये बँक बंद 
3 : रविवार
5 : गुरु हरगोबिंद का प्रकाश दिवस – जम्मू और काश्मीर
6 : एमएचआईपी दिवस – मिझोरम
7 : खर्ची पूजा- आगरतला
9 :   दुसरा शनिवार, बकरी ईद
10 : रविवार 
11 : ईज-उल-अजा- जम्मू आणि श्रीनगर में बैंक बंद
13 : भानू जयंती - गंगटोक
14 : बेन डिएनखलाम- शिलॉंग
16 : हरेला- देहरादून
17 : रविवार
23: चौथा शनिवार
24 : रविवार 
26 : केर पूजा- आगरतला
31 : रविवार