Bank Holidays In August 2022: नवा महिना सुरु होऊन पहिले दोन दिवसही उलटले आहेत. मुख्य म्हणजे नवा माहिना सुरु झाल्यानंतर सुरुवातीलाच काही कामं उरकण्याच्या निमित्तानं अनेकजण बँकेच्या दिशेनं धाव घेत असतील. काहींनी आपली कामं अमुक दिवशी करायची म्हणून तयारीही केली असेल. पण, बँकेत तुमची फेरी वाया जाऊ नये यासाठी सर्वप्रथम ही बातमी वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांना बऱ्याच सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तीन विभागांमध्ये या सुट्य्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. 


Negotiable Instruments Act, Real Time Gross Settlement Holiday आणि Banks Closing of Accounts चा समावेश आहे. म्हणजेच राष्ट्रीय सुट्ट्यांव्तिरिक्त इतरही काही सुट्ट्या आहेत जेव्हा बँका बंद असणार आहेत. 


बँका नेमक्या केव्हा बंद असतील?  (Bank Holidays in August)
देशातील विविध भागांमध्ये बँका खालील दिवशी बंद असतील. 


7 ऑगस्त- रविवार, सर्व बँकांची साप्ताहिक सुट्टी
8 ऑगस्ट- मोहर्रम (अशूरा) जम्मू आणि श्रीनगरमधील बँका विशेषत: बंद 
9 ऑगस्ट- चंडीगढ़, देहरादून, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाल, जम्मू, पणजी, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि श्रीनगर वगळता देशातील इतर बँकांना सुट्टी 
11 ऑगस्ट- रक्षाबंधनच्या निमित्तानं बँकांना सुट्टी 
12 ऑगस्ट- रक्षाबंधन (कानपुर, लखनऊ) 
13 ऑगस्ट- महिन्याचा दुसरा शनिवार असल्या कारणानं देशातील सर्व बँका बंद 
14 ऑगस्ट - रविवारची साप्ताहिक सुट्टी 
15 ऑगस्ट- स्वातंत्र दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय सुट्टी 
16 ऑगस्ट- पारसी नववर्षानिमित्त सुट्टी 
18 ऑगस्ट- कृष्णजन्माष्टमीची सुट्टी 
19 ऑगस्ट- गोपाळकालानिमित्त काही बँका बंद असतील
21 ऑगस्ट- रविवारची साप्ताहिक सुट्टी 
27 ऑगस्ट - चौथा शनिवार, बँका बंद 
28 ऑगस्ट- रविवारची साप्ताहित सुट्टी 
31 ऑगस्ट- गणेश चतुर्थीनिमित्त  गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँकांना सुट्टी