Bank Holidays in Feb: 2023 या नवीन वर्षातला पहिला महिना जानेवारी आता संपत आला आहे. आणि अवघ्या काही दिवसात फेब्रुवारी (February)महिना उजाडणार आहे. हा महिना जवळ येताच, अनेकांना उत्सुकता असणार आहे की, नवीन महिन्यात किती दिवस बॅंका बंद (Bank Holidays)असणार आहे. तर याचे उत्तर आता समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात साधारण 10 दिवस बॅंका बंद असणार आहेत. त्यामुळे आता यानुसार बॅकांच्या कामाचे नियोजन ग्राहकांना करता येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन महिना उजाडताच नागरीकांची सॅलरी होते. त्यामुळे ही सॅलरी काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची धाव बॅकांकडे असते. तसेच अनेक बॅकींग कामासाठी नेमकी बॅंक कधी कधी खुली असणार आहे? हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. त्यानुसार आता फेब्रुवारी (Bank Holidays) महिन्यात विशेष असे काही सण नाही आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार सोडता बॅका सुरूच राहणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात 10 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होणार आहे. 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात (Bank Holidays) बँकेला भरपूर सुट्ट्या आहेत. या संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाचे काम करायची असतली तर ही सुट्टय़ाची यादी एकदा पाहाच. 


'या' दिवशी बॅंका बंद


  • 5 फेब्रुवारी 2023 - रविवार 

  • 11 फेब्रुवारी 2023 - दुसरा शनिवार 

  • 12 फेब्रुवारी 2023 - रविवार 

  • 15 फेब्रुवारी 2023-  हैदराबाद सोडून इतर राज्यात बॅंका सूरू

  • 18 फेब्रुवारी 2023 - महाशिवरात्री (अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, तिरुअनंतपुरम येथे बँका बंद राहतील)

  • 19 फेब्रुवारी 2023 - रविवार 

  • 20 फेब्रुवारी 2023 - राज्य दिन (आयझॉलमध्ये बँका बंद)

  • 21 फेब्रुवारी 2023- लोसर (गंगटोकमध्ये बँका बंद )

  • 25 फेब्रुवारी 2023 - तिसरा शनिवार (देशभर बँका बंद)

  • 26 फेब्रुवारी 2023 - रविवार (भारतभर बँका बंद )


दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या (Bank Holidays) एकूण 28 दिवसांपैकी विविध राज्यांमध्ये 10 दिवस बँका बंद राहतील. यातील अर्ध्याहून सुट्या य़ा रविवार आणि शनिवारच्या आहेत. बाकी इतर दिवशी बॅंका सुरुच असणार आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसौय होण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र बॅंका जाण्यापुर्वी ही सुट्टयाची यादी एकदा पाहाच.