मुंबई : कोरोना साथीच्या काळात आपण बँकेची कामं ऑनलाईन माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु अनेकदा ग्राहकांना चेक क्लिअरन्स आणि कर्जाशी संबंधित सेवांसह विविध कामांसाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. अशा परिस्थितीत आपल्याला हे माहित असले पाहिजे की ज्या दिवशी आपल्याला बँकेत जायचे आहे. त्या दिवशी बँकांना सुट्टी तर नाही ना.  (Bank holidays in May 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 मे 2021 : दुसरा शनिवार असल्याने या दिवशी बँक बंद असेल.


9 मे 2021: रविवार असल्याने बँक बंद राहिल.


13 मे 2021: ईद-उल-फितर असल्याने यामुळे महाराष्ट्र, जम्मू, काश्मीर आणि केरळमधील बँकांना सुट्टी असेल.


14 मे 2021: या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती तसेच रमजान-ईद आणि अक्षय तृतीया असल्याने या दिवशी महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, केरळ सोडून इतर राज्यात बँकांना सुट्टी असेल.


16 मे 2021: रविवार असल्याने बँका बंद राहतील.


22 मे 2021: या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.


23 मे 2021: रविवार असल्याने बँक बंद राहिल.


26 मे 2021: बुद्ध पौर्णिमा असल्याने त्रिपुरा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.


30 मे, 2021: रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे.