RBIच्या अॅक्शननंतर HDFC बँकेच्या ग्राहक सेवांवर परिणाम?
एचडीएफसी बँकेत ग्राहकांना व्यवहारा दरम्यान अनेक समस्या उद्भवत होत्या, या पार्श्वभूमीवर बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांनी माफी मागितली आहे.
मुंबई : एचडीएफसी बँकेत ग्राहकांना व्यवहारा दरम्यान अनेक समस्या उद्भवत होत्या, या पार्श्वभूमीवर बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांनी माफी मागितली आहे. तांत्रिक अडचणीनंतर बँकिंग नियमक आरबीआयने एचडीएफसी बँकेला ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर बंदी घातली आहे.
त्याचबरोबर असेही म्हटले आहे की, खासगी क्षेत्रातील ही दिग्गज बँक या क्षणी कोणत्याही नवीन डिजिटल प्लॅन्सवर काम करणार नाही शेयरहोल्डर्सशी झालेल्या पहिल्या चर्चेत, एचडीएफसी बँक आपल्या पतपुरवठा आणि ग्राहकांना उत्तम सुविधा देईल याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
जगदीशन म्हणाले, "जे घडले त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर व्यक्त करतो. आम्ही स्वत: ला सुधारण्याची एक संधी देऊ इच्छीत आहोत आणि ही समस्या संपवण्यासाठी आम्ही गरज पडल्यास डबल ड्यूटी करू." त्यानंतर त्यांनी असे सांगितले की, आरबीआई त्यांना बँकेच्या आयची सिस्टमसाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
बँकेच्या वार्षिक अहवालात शेयर होल्डर्सला संबोधित करताना बँकेने हे सांगितले की, त्यांनी बँकेच्या थर्ड पार्टी ऑडिटचे काम पूर्ण झाले आणि बँकेने आरबीआयकडे आपला अहवाल सादर केला आहे. एचडीएफसी बँक आता आरबीआयच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.
10 कोटी दंडही
जगदीशन यांनीही कबूल केले आहे की, आरबीआयने वेंडर्स ना ऑटो कर्जासह जीपीएस उपकरणांचे वितरण केल्याबद्दल बँकेला दंड आकारण्यात आला आहे. ते म्हणाले, "यासाठी दहा कोटी रुपयांचा दंड आमच्यावर लादला गेला आहे. या प्रक्रियेद्वारे मिळालेल्या कमिशनलाही ग्राहकांना परत करण्यास आम्हाला सांगितले गेले आहे. आम्ही हा आदेश स्वीकारला आहे आणि आम्ही त्याचे पालन करू."
ऑटो लोन्स-वेंडर म्हणजे नक्की काय?
खरं तर, नोव्हेंबर 2019 मध्ये, एक व्हिसिलब्लोअरने असा आरोप केला की, जीपीएस उत्पादनांसाठी एक वेंडर ऑटो लोन टीमच्या काही कर्मचार्यांना इंसेटिव्स देतो. बँकेच्या वतीने त्वरित याची चौकशी करण्यात आली आहे आणि त्यासाठी आवश्यक पावले देखील उचलण्यात आल्याची माहिती जगदीशन यांनी दिली.
डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यात बँक पुढे
एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक क्रेडिट / डेबिट कार्ड देण्याच्या बाबतीतही अग्रही आहे. डिसेंबर 2020 पर्यंत एचडीएफसी बँकेने 1.5 कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. तर डेबिट कार्ड 3.38 कोटी इतके जारी केले आहे.
मार्च 2020 म्हणजेच संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत एचडीएफसी बँकेचा रिटेल पोर्टफोलिओ सुमारे 7 टक्के दराने वाढला आहे. रिटेल फ्रेंचायझींच्या सहकार्याने एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड व्यवसायात 12 टक्क्यांनी आणि गृह कर्जात 10 टक्क्यांनी वाढ केली आहे.