Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, `येथे` पाठवा अर्ज
Bank of Baroda Bharti 2023: बॅंक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
बॅंक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 वर्षांचा अनुभव असावा. किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य आणि 6 वर्षे अनुभव असावा.
सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे असावे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत दिली जाणार आहे.
जनरल/ओबीसी/ईडब्लूयएस उमेदवारांकडून 600 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून 100 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 63 हजार 840 ते 78 हजार 230 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी करता येणार आहे.
सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 26 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये कोणतीही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती
राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या 43 विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान 75 हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4 हजार 629 पदे भरली जाणार आहेत. जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील स्टेनोग्राफर, ज्युनिअर क्लर्क, कॉन्स्टेबल, पोर्टर या रिक्त पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिलेल्या मुदतीपर्यंत आपले अर्ज पाठवायचे आहेत. उमेदवारांना 18 डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.