मुंबई : Bank Of Baroda Lending Rates Hike : HDFC बँकेच्या वतीने व्याजदरात वाढ केल्यानंतर आता आणखी एका सरकारी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. आता बँक ऑफ बडोदा (BoB) नेही रेपो दरात वाढ केली असून कर्जाच्या व्याजदरात 0.1 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये MCLR 0.1 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले.


उद्यापासून नवीन दर लागू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळ्या वेळेसाठी वाढलेले व्याजदर 12 मेपासून लागू होतील, असे बँकेकडून सांगण्यात आले. बँकेने एक वर्षाचा MCLR बदलून 7.40 टक्के केला आहे, तो आतापर्यंत 7.35 टक्के होता. बँकेचे बहुतांश ग्राहक या कर्जाच्या श्रेणीत येतात.


MCLR मध्ये मोठी वाढ


 तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 7.15 टक्के आणि 7.25 टक्के करण्यात आला आहे. यासह, एक दिवस आणि एक महिन्याच्या MCLR आधारित कर्जासाठी इंटरनेट दर 0.10 टक्क्यांनी वाढवून 6.60 टक्के आणि 7.05 टक्के करण्यात आला आहे.


रेपो दर वाढीनंतर बदल


RBI ने 4 मे रोजी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर बँक ऑफ बडोदाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, इंडियन ओव्हरसीज बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, करूर वैश्य बँक इत्यादींनी देखील त्यांचे MCLR आणि रेपो दराशी संबंधित व्याजदर सुधारित केले आहेत.