नवी दिल्ली : पब्लिक सेंटर बँकमध्ये (Public Sector Bank) नोकरीची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर आणि प्रोजेक्ट असोसिएट्स या पदांसाठी सरकारी नोकरीसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या दोन पदांसाठी उमेदवार पात्र असल्यास त्याला 6 जुलै 2020 पूर्वी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद - मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट्स
पदांची संख्या - 6
पात्रता - कंप्यूटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्यूनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटेशन इंजिनियरिंगमध्ये B.E/B.Tech किंवा MCA/M.SC (IT)/M.Sc (कंप्यूटर सायन्स) 
वेतन - 59,170 प्रति महिना
वयोमर्यादा - 26 ते 45 वर्षे


परीक्षा फी


बँक ऑफ बडोदातील या भरतीसाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवाराला 600 रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे. त्याशिवाय एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवाराला 100 रुपये भरावे लागणार आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे परीक्षा फी भरता येऊ शकते.


6 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


या भरतीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार बँकच्या अधिकृत वेबसाईटवरील https://www.bankofbaroda.in/career-detail.htm#tab-18 या  लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती घेऊ शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला https://www.bankofbaroda.in/career-detail.htm या लिंकवर जाऊन रजिस्टर करावं लागेल.


या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे संबंधित डोमेनमध्ये 7 ते 10 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. शॉर्ट लिस्टिंग, लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत/ ग्रुप डिस्कशनद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.