चेक पेमेंट सिस्टिमचे नियम बदलले! जाणून घ्या अन्यथा व्यवहार होईल रद्द
तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. बँकेने आपल्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. बँकेने कालपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू केले आहेत.
मुंबई : तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. बँकेने आपल्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. बँकेने कालपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू केले आहेत.
चेक क्लिअरन्स सिस्टममध्ये बदल
चेक क्लिअरन्स (Positive Pay Confirmation) शी संबंधित बँक ऑफ बडोदाचे नियम बदलले आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आता 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन अनिवार्य झाले आहे. चेकची खात्री न झाल्यास तो चेक परत केला जाऊ शकतो. हे नियम 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशांवर लागू असतील.
बँक ग्राहकांना आवाहन
बँकेने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे की, 'तुम्ही सीटीएस क्लिअरिंगसाठी Positive Pay सुविधेचा लाभ घ्यावा. चेकमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून बँकेने हा नियम केला आहे. बँकेने म्हटले की, ग्राहकांनी विविध पर्यायांनी पडताळणी करून फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे.
बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना Positive Pay Confirmation साठी 8422009988 या व्हर्च्युअल मोबाईल क्रमांकाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. या नवीन नियमानुसार, CPPS लिहिल्यानंतर, खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेकची तारीख, चेक खाते, व्यवहार कोड, प्राप्तकर्त्याचे नाव 8422009988 वर पाठवल्यानंतर खात्री केली जाईल.
याशिवाय, ग्राहक 1800 258 4455 आणि 1800 102 4455 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात.
Positive Pay System काय आहे?
धनादेश ट्रंकेशन प्रणाली अंतर्गत धनादेश क्लिअरिंगमध्ये फसवणुकीपासून संरक्षण प्रदान करण्यासाठी Positive Pay System तयार करण्यात आली आहे.
Cheque Truncation System ही चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे धनादेश वसुलीची प्रक्रिया जलद होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) बँकांना Cheque Truncation System (CTS) मध्ये Positive Pay सुविधा प्रदान करत आहे.
50 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकद्वारे पेमेंट केल्यावर ही प्रणाली लागू होईल.
Positive Pay प्रणाली कशी कार्य करते?
या प्रणालीद्वारे एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेकची माहिती देता येईल. चेकचे पेमेंट करण्यापूर्वी या तपशीलांची पुन्हा पडताळणी केली जाईल.
त्यात काही तफावत आढळल्यास बँक चेक नाकारेल. येथे जर दोन बँकांचे प्रकरण असेल, म्हणजे ज्या बँकेचा धनादेश कापला गेला आहे आणि ज्या बँकेत धनादेश घातला गेला आहे, तर दोघांनाही याबद्दल माहिती दिली जाईल.