Bank Of Barod Positive Pay System: तुमचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदाने 1 ऑगस्टपासून ग्राहकांसाठी चेक व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या निर्देशांनंतर बँक ऑफ बडोदा चेक व्यवहाराच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. 1 ऑगस्टपासून चेक पेमेंटच्या नियमात बदल होणार आहे.  1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकच्या पेमेंटसाठी पॉजिटिव पे सिस्टम (PPS) अनिवार्य असेल. या चेकअभावी पेमेंट केले जाणार नाही. म्हणजेच 1 ऑगस्टपासून ग्राहकांना चेक देण्यापूर्वी चेकची माहिती द्यावी लागणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक दिल्यास त्याचा तपशील बँकेला द्यावा लागेल.  बँकेने चेक क्लिअर करण्यापूर्वी त्याचे क्रॉस व्हेरिफाय केले जाईल. बँकेने पडताळणी केल्यानंतर चेकचे पेमेंट करता येते. चेक पडताळणी दरम्यान सर्व माहिती उपलब्ध नसल्यास, बँक तो चेक क्लिअर करणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन निर्देशांनुसार, तुम्ही एखाद्याला चेक देताच, तुम्हाला एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाइल बँकिंगद्वारे त्याची माहिती आणि लाभार्थ्याची संपूर्ण माहिती बँकेला द्यावी लागेल. तुम्हाला लाभार्थ्याचे नाव, खाते क्रमांक, रक्कम, चेक क्रमांक यासारखी आवश्यक माहिती बँकेला द्यावी लागेल. पेमेंट करण्यापूर्वी बँक तुम्हाला याबद्दल कन्फर्मेंशन विचारेल. पडताळणीशिवाय चेक क्लिअर होणार नाही. बँक ऑफ बडोदाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही तुमच्या बँकिंग सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. पॉजिटिव पे सिस्टम, चेक फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करतो. 1 ऑगस्ट 2022 पासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेसाठी पॉजिटिव पे सिस्टम अनिवार्य असेल.



काय आहेत आरबीआयची मार्गदर्शक तत्वे?


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50,000 आणि त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी पॉजिटिव पे सिस्टमची सुविधा प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. सेंट्रल बँकेने 5 लाख रुपयांवरील धनादेश अनिवार्य करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.