Buy Property : खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करा फ्लॅट, प्लॉट आणि दुकान; `ही` सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी
How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं
How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं. पैशांची जुळवाजुळव असो किंवा मग कर्ज (Loan) काढत ही गरज भागवणं असो, हक्काचं काहीतरी मिळवण्यासाठी ही सर्व गणितं केली जातात. तुम्हीसुद्धा हक्काच्या घरातासाठी किंवा एखादा भूखंड खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर एक मोठी संधी चालून आली आहे. ज्यामुळं तुम्ही अगदी सहजपणे घर खरेदी करु शकता. निवासी, व्यावसायिक, कृषी, फ्लॅट, प्लॉट आणि तत्सम कारणांसाठी आवश्यक असणारी घरं, भूखंड खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे.
जवळपास 1000 हून अधिक मालमत्तेवर बोली लावण्याच्या प्रक्रियेत तुम्हीही सहभागी होऊ शकता. ही सुवर्णसंधी बँक ऑफ इंडिया (Bank Of India) च्या वतीनं देण्यात आली आहे, जिथं खिशाला चाप न लावता तुम्ही मनाजोगं घर किंवा भूखंड खरेदी करु शकता. (bank of india Mega E Auction Cheap Property Latest News )
हेसुद्धा वाचा : Bank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम
एका ट्विटमुळं मिळाली माहिती
बँक ऑफ इंडियाच्या वतीनं ट्विटरवर सदरील माहिती देणारी एक पोस्ट करण्यात आली. यामध्ये Mega E-Auction चा उल्लेख करण्यात आला होता. 'सस्ती कीमतों पर, आकर्षक सम्पत्तियों की ई नीलामी' असं लिहित हे ट्विट करण्यात आलं. यामध्ये एका संकेतस्थळाची लिंकही देण्यात आली आहे. जिथं क्लिक करून इच्छुक व्यक्ती सविस्तर माहिती मिळवू शकतात.
कोणकोणत्या शहरांमध्ये खरेदी करु शकता मालमत्ता?
या लिलावामध्ये तुम्ही बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैदराहबाद, कोलकाता, मुंबई (Property rates in mumbai) आणि इतरही काही मोठ्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करु शकता. यासाठी 9 डिसेंबरपर्यंत तुम्ही लिलावात बोली लावू शकता. अधिक माहितीसाठी https://bankofindia.co.in/web/guest/home या लिंकवर क्लिक करा.
लिलावात असणाऱ्या मालमत्ता नेमक्या कोणाच्या?
बँकेकडून लिलाव करण्यात येणारी मालमत्ता नेमकी कोणाची? असा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास हे त्याचं उत्तर. अनेकजण सहसा बँकेकडून मालमत्तांच्या अनुषंगानं कर्ज घेतात. पण, काही कारणास्तव त्यापैकी काहींना कर्ज फेडणं शक्य होत नाही. अशावेळी बँकेकडून कारवाई करत सदर व्यक्तीचं घर, प्लॉट ताब्यात घेतलं जातं. ठराविक अंतरानं बँका अशा मालमत्तांचा लिलाव करून कर्जाची उर्वरित रक्कम वसूल करतात.