मुंबई: सर्वसामान्य ठेवीदारांसाठी अत्यंत महत्त्वाचं वृत्त सध्या समोर येत आहे. १ ऑक्टोबरपासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या जवळपास ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात जवळपास १ हजार ९०० शाखा आहेत. त्यातीलच ५१ शाखांना आता टाळं लागणार आहे. शहरी भागात असणाऱ्या शाखांमधील उत्पनाचा बँकेला काही फायदा होत नसल्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


संबंधित शाखा बंद केल्यानंतर त्यात असणाऱ्या खातेधारकांचं बँकेच्या दुसऱ्या शाखांमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. 


पुढील ठिकाणी असणाऱ्या शाखांना लागणार टाळं-


ठाणे (७)
मुंबई (६)
पुणे (४)
नाशिक आणि बंगळुरू (प्रत्येकी ३)
अमरावती, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, सातारा, हैदराबाद, चेन्नई (प्रत्येकी २)
नोएडा, कोलकाता, चंदीगढ, रायपूर, गोवा, सोलापूर, कोल्हापूर, (प्रत्येकी १)


दरम्यान, बँकेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोडही रद्द करण्यात आले आहेत. 


शिवाय, बंद करण्यात आलेल्या ५१ शाखांमधील खातेधारकींनी त्यांच्याकडे असणारे चेकबुक हे ३० नोव्हेंबरपर्यंत बँकेकडे जमा करण्यासही खातेधारकांना सांगण्यात आलं आहे. सोबतच नव्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडच्याच मदतीने पुढील व्यवहार करण्यास खातेधारकांना सांगण्यात आलं आहे.