बँका सलग चार दिवस राहणार बंद
तुमची बँकेची काही कामे आहेत तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँक बंद असणार. त्यानंतर ३० एप्रिलला बुद्धपोर्णिमेनिमित्त बँक बंद असणार आहे. त्यानंतर १ मेला महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
मुंबई : तुमची बँकेची काही कामे आहेत तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँक बंद असणार. त्यानंतर ३० एप्रिलला बुद्धपोर्णिमेनिमित्त बँक बंद असणार आहे. त्यानंतर १ मेला महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
सलग चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने तुमची महत्त्वाची कामे असतील ती पुढच्या तीन दिवसांत आटोपून ध्या. सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने एटीएममध्येही पैशाची कदाचित कमतरता भासू शकते.
चार दिवस सलग सुट्ट्या आल्याने सरकारी नोकरदारांची चंगळ आहे. अनेकांनी फिरण्यासाठीचे प्लानही बनवले असतील. त्यामुळे या काळात वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.