Bank of Maharashtra मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; अप्लाय करण्यासाठी वाचा
Bank of Maharashtra Recruitment 2022 : बँकेत काम करू इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती होणार आहे.
मुंबई : Bank of Maharashtra Recruitment 2022 : बँकेत काम करू इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर रिक्रुटमेंट 2022 साठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती घेऊ.
बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra (BOB)ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर bankofmaharashtra.in वर 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 5 फेब्रुवारी पासून अर्ज करण्यासाठी लिंक जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे.
जनरलिस्ट ऑफिसर (Generalist Officer Posts) पदासाठी 12 मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना गट चर्चेसाठी / मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर भरती 2022 साठी पुढील तपशील वाचा.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ - @bankofmaharashtra.in
नोटीफिकेशन - 14 फेब्रुवारी 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
परीक्षेची तारीख 12 मार्च 2022
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही विषयातील पदवीधर