नवी दिल्ली: बँकांच्या कोट्यवधी रूपयांच्या कर्जाचा परतावा न करता देशाबाहेर पळ काढणारा मद्यसम्राट विजय माल्याची संपत्ती नेमकी किती याचा पत्ता कोणालाच नाही. त्यामुळे देशातील बँकांची झोपच उडाली आहे. इंग्लंडच्या हायकोर्टाने विजय मल्याची इंग्लंडमधील संपत्ती जप्त करण्याचे आदेश तर दिले. पण, यात विजय माल्याची नेमकी किती संपत्ती जप्त होईल हे मात्र स्पष्ट झाले नाही. एन्फोर्समेंट ऑफिसर्सकडून १०४९९ कोटी रूपये वसूलीचे आदेश मिळाले आहेत. पण, महत्त्वाचे असे की, विजय मल्ल्याची इग्लंडमध्ये जी संपत्ती आहे त्यातून बँकांच्या कर्जाची वसूली करता येणार नाही. इंग्लंडच्या हाय कोर्टाने आदेश दिल्यामुळे भारत सरकार आणि भारतातील बँका भलेही खशू झाल्या असतील. पण, माल्याची एकूण संपत्ती किती याबबत कुणालाच माहिती नाही. 


माल्याने स्वत:च केला खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाय कोर्टाने ८ मेला दिलेल्या आदेशानुसार ब्रिटीश एनफोर्समेंट ऑफिसर्सला माल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे भारती बँका आपले कर्ज वसूल करू शकतील. पण, विजय माल्लाने स्वत:च आपल्या संपत्तीबाबत न्यायालयाकडे शपथपत्र दिलं आहे. त्यात काही गाड्या आणि आभूषणांची नोंद आहेत आणि ही संपत्ती मी स्वता कोर्टात जमा करण्यास तयार आहे. या व्यतिरिक्त काहीच मिळणार नसल्याचं कर्जबुडव्या विजय माल्याने सांगितलंय.


केवळ ७८२ कोटी रूपयांची संपत्ती


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०१६ला माल्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयात विदेशातील संपत्तीचे विवरण दिले. त्यात त्याच्याजवळ ११.४ कोटी डॉलर म्हणजेच ७८२ कोटी रूपयांची संपत्ती आहे. यात कोणतीही रोख रक्कम नाही. पण, ५.२५ मिलियन डॉलर म्हणजेच ३६ कोटी रूपयांची 'इन्वेस्टमेंट आणि कॅश इक्विवॅलेंट'चा समावेश आहे. विशेष म्हणजे या विवरणपत्रात पत्नी आणि मुलांच्या संपत्तीचा समावेश नाही.