नवी दिल्ली : बँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात म्हणून महत्त्वाची कागदपत्रे वा सोनं तुम्ही लॉकरमध्ये ठेवलं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयकडून असे स्पष्ट करण्यात आलेय की बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाच्या नुकसानीसाठी बँक कोणत्याहीप्रकारे जबाबदार राहणार नाही.  माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीवरुन हे समोर आलेय. 


जर एखाद्या सरकारी बँकेतील लॉकरमध्ये असलेल्या तुमच्या वस्तू चोरी होतात अथवा एखादा अपघात झाल्यास बँक कोणतीही नुकसानभरपाई देत नाही. भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकारी क्षेत्रातील १९ बँकांनी माहिती अधिकार कायदयांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिलीये.


माहिती अधिकार कायदयांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना १९ बँकांनी म्हटले की आमचा ग्राहकांशी संबंध हा मालक आणि भाडेकरु यांच्यातील संबंधांसारखा आहे. या १९ बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, युको आणि कॅनरासराख्या बँकांचा समावेश आहे. लॉकर हे बँकेत जरी असले तरी त्यातील वस्तूची जबाबदारी ग्राहकांची आहे. काही बँकांनी तर आपल्या लॉकर हायर अँग्रीमेंटमध्ये असे स्पष्ट केलेय की लॉकरमध्ये ग्राहकांनी आपल्या जबाबदारीवर महत्त्वाचे सामना ठेवावे.