२० जानेवारीपासून महागणार `या` सेवा, सामान्यांना बसणार झटका
बँकांच्या ब्रांचमधून होणाऱ्या कामांवर मोफत सेवांसाठीही आता शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : बँकांच्या ब्रांचमधून होणाऱ्या कामांवर मोफत सेवांसाठीही आता शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे.
२० जानेवारीपासून सर्व सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रातील बँकेच्या शाखांमध्ये मिळणाऱ्या मोफत सेवांसाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. या सुविधांमध्ये पैसे काढणे, जमा करणे, मोबाईल नंबर बदलणं, केवायसी, पत्ता बदलणं, नेट बँकिंग आणि चेकबुकसाठी अर्ज करण्याच्या सुविधांसा समावेश आहे.
दुसऱ्या ब्रांचमध्ये व्यवहार केल्यास शुल्क द्यावे लागणार
आपलं अकाऊंट असलेल्या बँकेच्या शाखेव्यतिरिक्त दुसऱ्या शाखेतील सेवेसाठी वेगळं शुल्क द्यावं लागणार आहे. या शुल्कासोबतच जीएसटीही द्यावं लागणार आहे. यासाठी बँक तुमच्याकडून वेगळे पैसे घेणार नाही तर, तुमच्याच बँक अकाऊंटमधून पैसे कापण्यात येतील.
बँकेच्या ग्राहकांना लागणार झटका
बँकेशी संबंधित सूत्रांच्या मते, नव्या शुल्कांसंदर्भात अंतर्गत आदेश मिळालेले आहेत. सर्वच बँका आरबीआयच्या आदेशांचं पालन करतात. नियमानुसार संबंधित बँकांचं बोर्ड सर्व सेवांवर लागणाऱ्या शुल्कावर अंतिम निर्णय घेतं. बँकांनी हा निर्णय घेतल्यास याचा फटका देशभरातील सर्वच ग्राहकांना बसणार आहे.
बँकर्सने हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते, जर ग्राहकांनी आपल्या होम ब्राँच व्यतिरिक्त इतर कुठल्याही ब्राँचमधून बँकिंग सेवा घेतल्यास त्यावर शुल्क आकारण्यात यावे.
ऑनलाईन बँकिंग सेवेला प्रोत्साहन
बँकेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, यामुळे ऑनलाईन बँकिंग पद्धतीला प्रोत्साहन मिळेल.