मार्चमध्ये सलग ५ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता
५ दिवस सरकारी बँका बंद राहण्याची शक्यता
मुंबई : मार्चमध्ये ५ दिवस सरकारी बँका बंद राहण्याची शक्यता आहे. बँक युनियन वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. याआधी १ फ्रेबुवारीला देखील बँक कर्मचारी संपावर होते. सरकारी बँकांची यूनियन असलेल्या बँक एप्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एंप्लॉयी असोसिएशन (AIBEA) ने आपल्या विविध मागण्यांसाठी 11, 12 आणि 13 मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 14 मार्चला दुसरा शनिवार आणि 15 मार्चला रविवार असल्याने बँका सलग 5 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
यूनियन बँकेच्या एका अधिकाऱ्यांने म्हटलं की, बँक कर्मचारी आपल्या पगारा संबंधित मागणीसाठी संपावर जात आहेत. प्रत्येक 5 वर्षाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार रिवाईज होतो. या नियमानुसार सरकारने 2012 मध्ये सॅलरी रिवाईज केली होती. त्यानतंर सरकारने कोणचंत काम पूर्ण केलं नाही.
बँक यूनियनने सरकारकडे ५ दिवसांचा आठवडा करण्याची ही मागणी केली आहे. पण मागणी फेटाळण्यात आली. बँक कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत.