दिवाळीचा सण आला असून, संपूर्ण देशभरात यानिमित्ताने उत्साह आहे. बाजारांमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी उसंडून वाहत आहे. घराची सजावट, फराळ यामध्ये सगळे व्यग्र असल्याने इतर कामं बाजूला ठेवण्यात आली आहेत. पण जर तुमचं बँकेशी संबंधित एखादं काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण बँका सलग 6 दिवस बंद असणार आहेत. म्हणजेच तुमच्या बँकेच्या शाखेत कोणतीही कामं होणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने महिन्याच्या सुरुवातीला आपल्या वेबसाईटवर Banking Holiday ची यादी जाहीर केली होती. ही यादी प्रत्येक राज्यातील सणांवर आधारित असते. नोव्हेंबर महिन्यातील बँक हॉलिडेच्या यादीनुसार, 10 ते 15 नोव्हेंबरपर्यंत बँकांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. 


पुढील आठवड्यात दिवाळी-भाऊबीजेची सुट्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या बँक हॉलिडे यादीनुसार, नोव्हेंबर महिन्यात एकूण 15 बँक हॉलिडे आहेत. यामधील काही सुट्ट्या संपल्या आहेत. दरम्यान, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा हे सण आगामी दिवसांत येणार आहेत. ज्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होणार आहे. या 6 सुट्ट्यांमध्ये शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. 


बँकेने जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी तुम्ही आरबीआयच्या बेवसाईटवरही पाहू शकता. 


रविवारी दिवाळी


आरबीआयकडून घोषित केलेल्या सुट्ट्या राज्यांप्रमाणे वेगळ्या असू शकतात. अशामध्ये तुम्ही सुट्ट्यांची यादी पाहिल्याशिवाय बँकेच्या कामासाठी घराबाहेर पडू नका. अन्यथा तुम्ही बँकेत पोहोचाल आणि तिथे टाळं लागलेलं असेल. तसंच बँका बंद असल्याने काही ठिकाणी एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडाही जाणवू शकतो. 


10 नोव्हेंबर वंगाला महोत्सव         शिलाँग


11 नोव्हेंबर दुसरा शनिवार           सर्व ठिकाणी


12 नोव्हेंबर रविवार/दिवाळी          सर्व ठिकाणी 


13 नोव्हेंबर      गोवर्धन पूजा अगरतला, देहरादून, गंगटोक, इंफाळ, जयपुर, कानपुर, लखनौ


14 नोव्हेंबर       दिवाळी अहमदाबाद, बेलापुर, बंगळुरु, गंगटोक, मुंबई, नागपुर 


15 नोव्हेंबर       भाऊबीज गंगटोक, इंफाळ, कानपुर, कोलकाता,लखनौ, शिमला 


 


ऑनलाइन करु शकता बँकेची कामं


बँकेच्या सुट्ट्या या वेगवेगळ्या राज्यात साजऱ्या होणाऱ्या सणांवर आधारित असतात. म्हणजेच एखादी सुट्टी दुसऱ्या राज्यात असेल तर ती आपल्याकडेही असेलच असं नाही. पण बँक बंद असल्या तरी तुम्ही ऑनलाइन बँकेची कामं करु शकता. ऑनलाइन सुविधा 24 तास उपलब्ध असल्याने तुम्ही आर्थिक व्यवहार करु शकता.