मुंबई : तुमची बँकांची काही काम राहिली असतील तर ती तातडीने करून घ्या. कारण दोन दिवस लागोपाठ बँका बंद राहणार असून जुलैच्या महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. आजपासून म्हणजेच शनिवारीपासून पुढील काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहतील. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती असणं आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज म्हणजेच 10 जुलैपासून लागोपाठ बँका दोन दिवस बंद राहणार आहेत. दुसरा शनिवार असल्याने बँकांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्याच्या पुढच्या दिवशी रविवारी 11 जुलै रोजी बँका बंद असतील. त्याशिवाय सोमवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत जवळपास 9 दिवस सणांच्या पार्श्वभूमीवर बँका बंद राहतील.


येत्या आठवड्यात बहुतेक बँकांच्या सुट्ट्या आहेत. आज दुसरा शनिवारी असल्याने 10 जुलै रोजी बँकांमध्ये सुट्टी आहे. तर रविवार असल्याने 11 आणि 18 जुलै रोजी बँका बंद राहतील. याशिवाय, सणांमुळे बँका सोमवार ते पुढच्या शनिवारी एकूण 9 दिवस बंद राहतील. 


दरम्यान, 15 जुलै रोजी बँकाना सुट्टी नाहीये. आरबीआयनुसार, या बँकेच्या सुट्टीचा निर्णय वेगवेगळ्या राज्यांनुसार घेण्यात येतो. त्यानुसार ज्या राज्यांत सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अशाच राज्यात बँका काम करणार नाहीत.


पाहा, सुट्ट्यांची संपूर्ण यादी...


1) 10 जुलै 2021 - दुसरा शनिवार


2) 11 जुलै 2021 - रविवार


3) 12 जुलै 2021 - सोमवार - कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ,)


4) 13 जुलै 2021 - मंगळवार - भानु जयंती (शहीद दिवस- जम्मू-काश्मीर, भानु जयंती- सिक्कीम)


5) 14 जुलै 2021 - द्रुकपा त्शेची (गंगटोक)


6) 16 जुलै 2021 - गुरुवार - हरेला पूजा (देहरादून)


7) 17 जुलै 2021 - खारची पूजा (अगरताळा, शिलाँग)


8) 18 जुलै 2021 - रविवार


9) 19 जुलै 2021 - गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु (Guru Rimpoche's Thungkar Tshechu) (गंगटोक)


10) 20 जुलै 2021 - मंगळवार - ईद अल अधा (देशभर)


11) 21 जुलै 2021 - बुधवार - बकरी ईद (संपूर्ण देशभर)