मुंबई : यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आल्यामुळे अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बँकांचे काम पूर्ण करून घ्या. आता नवीन महिना आणि नवीन कामांच नियोजन सुरू झालं असेल. तर या नियोजनापूर्वी जाणून घ्या नोव्हेंबर महिन्याचं शेड्युल. नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे काही दिवस एटीएममधून देखील पैसे काढणे कठिण होणार आहे. त्यामुळे ऐन सणांच्या दिवशी आर्थिक घडी बिघडू नये म्हणून लवकरात लवकर बँकांचे काम पूर्ण करून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ नोव्हेंबर म्हणजे आज रविवार आणि गोवर्धन पूजन असल्यामुळे आज संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी भाऊबीज निमित्ताने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर २० आणि २१ नोव्हेंबर रोजी छटपूजा असल्यामुळे बिहार आणि झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत. 


त्यानंतर २२ नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे कामकाज बंद राहिल. शिवाय २८, २९, आणि ३० नोव्हेंबर रोजी देखील बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. २८ नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्यामुळे आणि २९ नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे काम बंद राहणार आहे. तर ३० नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. 


याशिवाय वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या सणांनुसार नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वेबसाइटला भेट देऊन तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. यामुळे आपापल्या राज्यातील सुट्या लक्षात घेऊन सर्व व्यवहार करा.