मुंबई : तुम्ही चुकून मास्क घालायचं विसरलात तर काय होईल. कुणीतरी तुम्हाला मास्क घालण्याची आठवण करुन देईल, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. किंवा तुम्हाला दंड भरावा लागेल. पण उत्तर प्रदेशातल्या बरेलीत मास्क लावला नाही म्हणून प्रचंड धक्कादायक घटना घडली आहे. (Bareilly bank guard arrested for shooting at customer after ‘row over not wearing mask’)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 (छाया सौजन्य - पीटीआय)


मास्क लावला नाही म्हणून मारली गोळी आणि रक्ताच्या थारोळ्यांत ती  पडली. ही व्यक्ती बँकेत जात होती. या व्यक्तीने मास्क लावला नव्हता. मास्क नाही तर प्रवेश नाही म्हणून बँकेच्या सिक्युरिटी गार्डनं त्याला अडवलं... मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली. त्यावरुन दोघांमध्ये भांडण सुरू झालं. हे भांडण एवढ्या टोकाला गेलं की सिक्युरिटी गार्डनं थेट त्याच्या पायावर गोळीच घातली. याप्रकरणी सिक्युरिटी गार्ड केशवला अटक करण्यात आली आहे. तर जखमीवर उपचार सुरू आहेत.


शुक्रवारी बरेली जिल्ह्यात फेस मास्क न घातलेल्या व्यक्तीवर एका 28 वर्षांच्या ग्राहकाला गोळीबार केल्याच्या आरोपाखाली एका बँकेच्या सुरक्षारक्षकास अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तथापि, सुरक्षारक्षक केशव म्हणाला की, त्याने बँक आवारात भांडणाच्या वेळी राजेश कुमारवर चुकून गोळीबार केला होता.


रुग्णालयात दाखल केलेल्या राजेशची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. बरेलीचे एसएसपी रोहितसिंह सजवान म्हणाले की केशवला अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येणार आहे. सजन म्हणाले की, “तक्रारीनंतर आम्ही गार्डविरुद्ध आयपीसी कलम 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


 मंडल अधिकारी (शहर -१) यतेंद्रसिंह नगर म्हणाले, “गुडघ्याच्या अगदी वरच्या बाजूला डाव्या मांडीवर गोळ्या घालण्यात आल्या. तो आता बरा आहे. ”


एवढं झाल्यावरही गोळी मारल्याचा कसलाही पश्चाताप सिक्युरिटी गार्डला झालेला नाही. तुरुंगात गेलो तरी दोघे मिळून जाऊ, असं त्याचं म्हणणे आहे. मास्क घातला नाही म्हणून दंड आकारला जातो. पण मास्क लावला नाही म्हणून थेट गोळी घालणाऱ्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी.