मुंबई : देशातील अनेक भागात 'नैरोबी फ्लाय' या माशीची दहशत पसरली आहे. ज्यामुळे तिच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. ही माशी दिसायला साधी दिसत असली तरी ती आपल्यासाठी खूपच धोकादायक आहे. ती जर आपल्या डोळ्यांवर बसली तर आपली दृष्टी जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ती आपल्या अंगावर बसली तर त्याभागी गंभीर दुखापत देखील होऊ शकते. त्यामुळे यासंबंधीत काही गाईडलाईन्स देखील जारी करण्यात आलेल्या आहेत. ज्याचे पालन केल्यावर आपल्याला या माशांपासून कसं वाचायचं आणि त्यांना जखम केल्यावर काय-काय उपाय योजना कराव्यात हे सांगितले गेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नैरोबी फ्लाय'च्या लक्षणाबाबत सांगितले जात आहे की, ही माशी शरीराच्या कोणत्याही भागात बसल्यावर जखमा करू शकते. डोळ्यावर बसल्याने दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. जखमेच्या ठिकाणी जळजळ आणि लालसर होण्याची समस्या उद्भवते.


जर ही माशीच्या अंगावर बसल्यावर ती हळुवारपणे कशाच्या तरी साहाय्याने काढून टाकावी. परंतु काहीही झालं तरी या माशीला चिरडून टाकू नका. नाहीतर त्याची जास्त गंभीर परिणाम होतील.



यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, त्यामुळे माशा जमा होणार नाहीत. जिथे कचरा किंवा गोड पदार्थांचा मोठा साठा आहे, तेथे जाऊ नका, कारण अशा ठिकाणी या माशा जास्त प्रमाणात अढळतात. 


जर तुम्हाला माशी चावली किंवा तिने गंभीर दुखापत केली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सिट्राझिन इत्यादी औषधे घ्या. जखमेच्या ठिकाणी अँटीबायोटिक क्रीम लावा.


पश्चिम बंगालमार्गे किशनगंज जिल्ह्यातील काही भागात 'नैरोबी फ्लाय' दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक लोक त्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. ज्यामुळे येथील बऱ्याच लोकांवर उपचार सुरू आहेत. तसेच बिहारमध्ये देखील या माशीची दहशत निर्माण झाली आहे. तसे पाहाता महाराष्ट्र किंवा मुंबई, पुणे, नाशिक सारखं ठिकाण या माशीपासून सध्यातरी सुरक्षीत आहे.