लग्नमंडपात सावध राहा... सुट-बुट घालणारा असा व्यक्ती देखील करु शकतो तुमची फसवणूक
सध्या सर्वत्र लग्नसराईचा सिजन सुरू आहे. परंतु अशा काळात चोर आणि भामट्यांच्या देखील सुळसुळाट होतो.
मुंबई : सध्या सर्वत्र लग्नसराईचा सिजन सुरू आहे. परंतु अशा काळात चोर आणि भामट्यांच्या देखील सुळसुळाट होतो. कारण याच कालावधीत त्यांची जास्त कमाई होते. हे भामटे चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपली युक्ती लढवतात आणि लग्न कार्यात घुसून आपले हात साफ करतात. मध्यप्रेदेशातील एका लग्नात असंच काहीसं घडलं. या लग्नात चोराने अशी काही एन्ट्री केली जी पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, ती व्यक्ती चोर आहे.
मध्यप्रदेशातील कटनी येथील एका गार्डमध्ये टिळक समारंभ सुरू होता. तेव्हा त्या लग्नात सूट-बूट घातलेला चोर शिरला. हा चोर या समारंभात असे भासवत होता की, तो कोणीतरी पाहूणा आहे. त्यांनंतर संधी मिळताच त्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि पाच लाखांची रोकड चोरून पळ काढला.
हे प्रकरण शहरातील एनकेजे पोलीस स्टेशन अंतर्गत जुहला बायपास जवळील आहे. चोरीची ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामुळे चोराचा पत्ता लावणे सहज शक्य झालं आहे.
या सीसीटीव्हीत हा तरुण दरवाजाला लाथ मारून कसा दरवाजा उघडतो आणि संधी साधून सामान घेऊन पळून जातो, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या संशयित तरुणाचा शोध सुरू केला आहे.
विजयराघवगड पोलीस ठाण्यांतर्गत बरहाटा गावातील रहिवासी अभिनेश बघेल यांचा जुहला रापाटाजवळील राघव रिजन्सी हॉटेलमध्ये टिळक समारंभ होता. बघेल कुटुंबातील सदस्य हॉटेलच्या 108 क्रमांकाच्या खोलीत थांबले होते आणि या खोलीत त्यांचे दागिने आणि पैसे होते.
टिळक समारंभाचे विधी आटोपून बघेल कुटुंबातील सदस्य खोलीत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, पाच लाख रुपये रोख, सोन्याचं जानवं, चांदीचे ताट, चांदीचा मासा असा ऐवज चोरीला गेला होता. ही चोरी सुमारे 10 लाख रुपयांची असल्याचे सांगण्यात येत आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 17 नोव्हेंबरला घडली आहे. मात्र, 19 नोव्हेंबर रोजी पोलिसांत एफआयआर नोंदवली येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि टिळक समारंभातील व्हिडिओग्राफी आणि फोटो पाहत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण दिसत आहे, जो ना वधू पक्षाशी संबंधित आहे ना नवरदेवाच्या बाजूचा आहे. काही ठिकाणी तोच तरुण पाहुण्यांसोबत बसलेलाही दिसतो. सूट-बूट कोट घातलेला तरुण चोरी करून फरार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस संशयित तरुणाचा शोध घेत आहेत. सध्या पोलिसांकडे चोरट्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
एनकेजे स्टेशन प्रभारी नीरज दुबे यांनी सांगितले की, टिळकचा कार्यक्रम होता. अभिनेश बघेल यांचा टिळक समारंभ होणार होता. सुमारे पाच लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने त्यांनी एका पिशवीत ठेवले होते. बॅग एका खोलीत ठेवून ते त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत होते. संशयित तरुणाने संधी साधून बॅग काढून निघून गेला.