मुंबई : दिवसेंदिवस देशात कॅशलेस व्यवहार किंवा डिजिटल व्यवहार वाढत आहेत. कोविड -19 साथीच्या आजारानंतर तर लोकांनी या सेवांचा जास्त प्रमाणात वापर करण्यासाठी सुरवात केला.  त्यामुळे आता पेटीएम ते Google pay पर्यंत,  असे बरेच प्लॅटफॉर्म बाजारात आले आहेत आणि लोक ते वापरत असतात. या सर्वांतच आता आधारवर आधारित पेमेंट सिस्टम (AEPS) चा ट्रेंडही वाढत आहे. परंतु आता या डिजिटल व्यवहारामुळे फसवणूकही वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत लोकांना सतर्क राहण्याची देखील गरज आहे.


बायोमेट्रिक माहिती सुरक्षित ठेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या AEPS वापरत असलेल्या सर्व लोकांना गृहमंत्रालयाने इशारा दिला आहे. मंत्रालयाच्या वतीने असे म्हटले गेले आहे की, बायोमेट्रिक माहिती अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, हे सुनिश्चित केले पाहिजे की, आपले बायोमेट्रिक हे सुरक्षित ठेवले पाहिजे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार संशयास्पद आणि अनधिकृत ठिकाणी कधीही फिंगरप्रिंट किंवा डोळयातील पडदा स्कॅन देऊ नये.


AEPS म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?


AEPS हे बँकेवर आधारित एक मॉडेल आहे जे ऑनलाइन व्यवहारांना परवानगी देते. आधार प्रमाणीकरण वापरुन हे बँकांमध्ये वापरले जाऊ शकते. AEPS ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केलेली प्रणाली आहे. मायक्रो-एटीएमद्वारे आधार क्रमांक आणि त्यांच्या फिंगरप्रिंट / आयरीस स्कॅनच्या मदतीने पडताळणी करून ही प्रणाली लोकांना पैसे काढण्यास मदत करते. यामध्ये पैसे काढण्यासाठी लोकांना त्यांच्या बँक खात्याची माहिती देण्याची गरज नाही.


या पेमेंट सिस्टमच्या मदतीने, लोकं त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात.


सुविधा काय 


या सुविधेचा लाभ फक्त तेच ग्राहक घेऊ शकतात, ज्यांचे बँक खाते आधारशी जोडले गेले आहे. कोणताही आधारधारक बँक खाते असलेले खातेदार या प्रणालीद्वारे व्यवहार करण्यास सुरवात करू शकतात.


पण त्याआधी त्यांना आपली ओळख फिंगरप्रिंट स्कॅन आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे प्रमाणित करावी लागेल. आधार पेमेंटमधून रोख रक्कम काढणे, खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती, आधार वरून दुसर्‍याच्या आधार लिंक खात्यात पैसे पाठविणे आणि मिनी स्टेटमेंट यासारख्या सुविधा लोकांना यामार्फत मिळत आहेत.