विजय चौकात पार पडणार `द बीटिंग रिट्रीट` समारोह`
दिल्लीच्या विजय चौकात आज `द बीटिंग रिट्रीट` समारोह पार पडणार आहे. `द बीटिंग रिट्रीट` समारोह हा चार दिवस सुरु असलेल्या प्रजासत्ताक दिन समारोहाचं अंतिम प्रतीक आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या विजय चौकात आज 'द बीटिंग रिट्रीट' समारोह पार पडणार आहे. 'द बीटिंग रिट्रीट' समारोह हा चार दिवस सुरु असलेल्या प्रजासत्ताक दिन समारोहाचं अंतिम प्रतीक आहे.
प्रजासत्ताक दिन हा समारोह २६ जानेवारीला नाही संपत तर २९ जानेवारीला संपतो. याचं समारोप बीटिंग रिट्रीट सेरेमनीने होतो.
भारताचं सैन्य शक्ती, समृद्ध, विविधता आणि सांस्कृतिक वारसा याचं दर्शन घडवतं. बीटिंग रिट्रीट सेरेमनीमध्ये तिन्ही दलाचे बँड आणि अर्धसैनिक दल, बीएसएफचे जवान हजर असतात.
प्रजासत्ताक दिन समारोह देशासाठी खूप महत्त्वाचं आहे. या समारोहाचं २६ जानेवारीच्या समारोहाचं देखील औपचारिक रूपात समापन होतं.
२९ जानेवारीला होणाऱ्या या समारोहात दिल्लीच्या विजय चौकात इंडियन आर्मी, इंडियन नेवी आणि इंडियन एयरफोर्सचे बँड परफॉर्म करतात. राष्ट्रपती भवनाच्या नॉर्थ आणि साउथ ब्लॉकवर बँडचं प्रदर्शन होतं. यानंतर राजपथाकडे याचा समारोप होतो. 'द बीटिंग रिट्रीट' समारोहाचे मुख्य अतिथी राष्ट्रपती असतात. येथे राष्ट्रपती बॉडीगार्ड्सच्या सुरक्षेत येतात. राष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षक यानंतर राष्ट्रपतींना नॅशनल सल्यूट करतात. यासोबत तिरंगा फडकवला जातो आणि राष्ट्रगीत होत.