मुंबई : हे तर सगळ्यांनाच माहित आहे की, एखादं फंक्शन असेल आणि त्यात नाच-गाणं नसेल तर ते होऊ शकतं का? लग्नापासून ते बर्थडे पार्टीपर्यंत लोक नाचण्या गाण्याचा कार्यक्रम ठेवतात. तेव्हा कुठे जाऊन तो फंक्शन पूर्ण होतो. लोकांचा असा वेगवेगळ्या कार्यक्रमातील डान्स हा व्हायरल देखील होतो. सोशल मीडियावर आपल्याला असे डान्स पाहायला मिळतात. जे फार मनोरंजक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाचे वातावरण आहे आणि आजूबाजूचे लोक खूप आनंदी दिसत आहेत. तसेच येथे डान्स फ्लोअरवरती एक जोडपं डान्स करताना दिसत आहे.


व्हिडीओत तुम्ही ऐकू शकता की, पॅक बना दे यार हे गाणं वाजत आहे. व्हिडीओमध्ये नाचणारी महिला साडीत आहे, तरी देखील ती आपल्या स्टाईलने या गाण्याचा ठेका धरत आहे. तिची ही शैली सर्वांनाच आवडली आहे.


ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स देखील करत आहेत.



हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, तसेच ही महिला आणि डान्स करणारा व्यक्ती यांमधील नातं यांबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. परंतु कमेंट सेक्शनमध्ये ही महिला त्या व्यक्तीची वहिनी असल्याचे सांगितले जात आहे.


युट्यूब वरती Raj sapna music नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.