मुंबई : लॉकडाऊनमध्ये आपल्या वडिलांना गुरूग्रामवरून सायकलवर बसवून बिहारच्या दरभंगा परिसरात घेऊन येणाऱ्या ज्योतीने सगळ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. ज्योतीने लॉकडाऊनमध्ये आपल्या वडिलांना परत . ज्योतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पने ज्योतीचं ट्विटरवरून कौतुक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इवांकाने ज्योतीच्या शूरपणाचं कौतुक केलं आहे. अवघ्या १५ वर्षांची ज्योती कुमारी आपल्या जखमी वडिलांना सात दिवस १,२०० किमीचा प्रवास करून गावी घेऊन आली. सहनशक्ती आणि व़डिलांप्रती असलेल्या प्रेमापोटी ज्योतीने सगळ्यांच लक्षकेंद्रीत केलं आहे. सायकलिग फेडरेशन ऑफ इंडियाकडून देखील कौतुक. 



ज्योतीचा विश्वास आणि तिची इच्छाशक्तीचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून देखील ज्योतीला एक लाख रुपयाची मदत करण्यात आली.


गुरूग्रामा ते दरभंगा सायकल प्रवास


कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. यामुळे मजुरांची खूप गैरसोय झाली. अनेकजण चालतच घराकडे वळले. ज्योतीचे वडिल एका अपघातात जखमी झाले त्यामुळे एकट्याने प्रवास करणं त्यांना शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत वडिलांना घरी परत आणण्याचा निर्णय ज्योतीने घेतला. १० मे रोजी गुरूग्रामवरून सायकल घेऊन निघालेली ज्योती दरभंगाकडे निघाली.


सात दिवसांत घरी पोहोचली


सात दिवसांचा प्रवास करून ज्योती १६ मे रोजी घरी पोहोचली. प्रवासात अनेक संकटांचा सामना करत ज्योतीने घर गाठलं. विचार पक्का असेल तर काहीच अशक्य नाही हे ज्योतीने दाखवून दिलं. या प्रवासात ज्योतीला अनेकांनी मदत देखील केली. ज्योती रात्री एखाद्या पेट्रोलपंपवर थांबत असे आणि सकाळी पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू करत असे.



सायकल फेड्रेशनने ट्रायलला बोलावलं


ज्योतीला सायकल फेड्रेशनवाल्यांकडून फोन आला आहे. त्यांनी ट्रायल बद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, संधी मिळाली तर नक्कीच जाईन पण सध्या माझं लक्ष अभ्यासाकडे आहे. आता तरी मी खूप थकलेली आहे. लॉकडाऊननंतर दिल्लीला जाऊन ट्रायल देणार आहे. शिक्षणासोबतच सायकलिंग करणार.