मोटा भाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात छोट्या भावाचं आंदोलन, हे आहे कारण
रेशन पुरवठा करणाऱ्या ५ लाख वितरकांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रह्लाद मोदी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.
नवी दिल्ली : देशभरात 80 टक्के लोकांना रेशन पुरवले जाते. परंतु, रेशन पुरवठा करणाऱ्या 5 लाख वितरकांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचे भाऊ प्रह्लाद मोदी ( Prahlad Modi ) यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात हे आंदोलन आहे. Save Ration, Save Nation ही मोहीम चालवली जाणार असून हे आंदोलन 4 जुलै 2022 रोजी ब्लॅाक स्तरावर, 11 जुलै 2022 रोजी उप विभागीय स्तरावर तर 18 जुलै 2022 रोजी सर्व देशभर आंदोलन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. रेशन वितरकांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय आहेत डीलर फेडरेशनच्या मागण्या
1. कमिशन योग्य पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे वर्ल्ड फूड प्रोग्राम आधारावर 440 रूपये कमिशन निश्चित करावे.
2. तांदूळ, गहू आणि साखर हाताळताना नुकसान होते. त्यावर 1 किलो प्रति क्विंटल देण्याचा विचार सरकारने करावा.
3. खाद्यतेल आणि कडधान्ये रास्त भाव दुकानांतून पुरवली जावीत.
4. LPG गॅस सिलिंडरचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून करावा. वाजवी किंमतीत दुकाने एलपीजी वितरकांकडून एलपीजी सिलिंडर गोळा करतील आणि त्यांच्या रास्त भाव दुकानांमध्ये टॅग केलेल्या एलपीजी ग्राहकांना घरोघरी पोहोचवतील. यात मार्जिन एलपीजी वितरक आणि रास्त भाव दुकानांद्वारे समान रीतीने केले जाईल.
5. सर्वांना मोफत रेशन वितरणाचे "पश्चिम बंगाल रेशन मॉडेल" आणावे.
6. ग्राहकांच्या घरांपर्यंत रेशन पोहोचवण्याची योजनांची काही घोषणा राज्यांनी केली होती. पण त्याची अमलबजावणी केली जाणार नसल्याचं सांगितलं.