हैदराबाद : मधमाशांमुळे बस प्रवाशांना किंवा शेतात कामाला गेलेल्या लोकांना किती त्रास झाला आहे याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. पण यावेळी मधमाशांनी चक्क एअर इंडियां विमानाच्या उड्डाणातच अडथळा निर्माण केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधमाशांमुळे एअरइंडियाचं विमान चक्क 1 तास थांबविण्यात आलं आहे. 26 जुलै रोजी मंगळवारी ही घटना घडली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मधमाशांनी विमानाच्या कॉकपिटवर चारही बाजूंनी घेरलं. त्यामुळे पायलटला कोणतीही गोष्ट करणं शक्य नव्हतं. अशावेळी पायलटला विमान थांबवण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उरला नाही. आणि त्यावेळी तब्बल 1 तास हे विमान थांबून राहिले. 


हैदराबादहून पुण्याला जाणारं हे विमान 9 आय -867 मध्ये जवळपास 65 प्रवासी होते. मधमाशांच्या हल्ल्यामुळे सगळ्यांनाच त्रासाचा सामना करावा लागला. हे विमान सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी उडणार असल्याचे निश्चित होते मात्र एक तास उशिरा या विमानाने उडाण घेतली.


 



एअर इंडियाचे प्रवक्ता धनंजय कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच त्यांनी देखील सांगितले की विमानाच्या कॉकपिटला मधमाशांनी चौफेर घेरल्यामुळे विमानाला उडण्यासाठी तब्बल 1 तास उशिर झाला. 


तसेच त्यावेळी त्यांनी सांगितले की, प्रवाशांची सुरक्षा ही आमच्यासाठी कायम महत्वाची असणार आहे. यामुळे पायलटने देखील सुरक्षा लक्षात घेता विमान सर्व गोंधळ शांत झाल्यावर उडवण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकार व्हिडिओत कैद झाला आहे. आणि त्यामध्ये स्पष्ट दिसते की कशा प्रकारे मधमाशा त्या कॉकपिटच्या आजूबाजूला होत्या.