मुंबई : काही दिवसात लग्न सोहळे सुरू होतील. यासाठी सोने चांदीची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या बाजारातील या वाढत्या मागणीमूळे सोन्याचा दर ही वाढला आहे.  शनिवारी सोन्याचा भाव ३२५ रुपयांनी वाढून ३०,७७५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.


चांदीची किंमत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दिल्लीतील सराफा बाजारात चांदीची किंमत ६०० रुपयांनी वाढून प्रकि कि.ग्रॅ. ४१,१५० झाली आहे. साप्ताहिक डिलिव्हरीमध्ये चांदीचा भाव ५६० रुपयांनी वाढून ४०,१५० रुपये किलो झाले आहे.


का वाढले दर?


काही दिवसांनी लग्न सोहळे सुरू होणार आहेत. यामूळे स्थानिक सोनारांकडून सोन्याची प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढत आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ


जागतिक स्तरावर सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०..०४ टक्क्यांनी वाढून १,७५५.६२ डॉलर प्रतिऔंस झाला. याच काळात, न्यू यॉर्कमध्ये सोने १.१८ टक्के वाढून १,२९३.४० डॉलर प्रति औस झाले. 
दरम्यान चांदीची किंमत १.३२  टक्क्यांनी वाढ होऊन ती १७.२८ डॉलर प्रति औंस झाली आहे.


दिल्लीतील दर 


दिल्लीत ९९.९ आणि ९९.५  टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे  वाढून ३०,७७५ रुपये आणि ३०,६२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.