मुंबई : आपल्याला नेहमी रस्त्याच्याकडेला गरीब किंवा भिकारी लोक नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांना कधी खायला देतो, तर कधी पैसे देतो. याशिवाय आपण त्यांना मदत करण्यासाठी दुसरं काहीही करु शकत नाही. परंतु उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही देखील थक्कं व्हाल. तेथे एक व्यक्ती अनेक दिवस भिकाऱ्याच्या पोशाखात फिरत होता. तो कोण होता, कुठून आला होता, हे कोणालाच माहीत नव्हते. परंतु जेव्हा त्याची ओळख पटली तेव्हा लोक थक्कं झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण हा माणूस भिकारी नसून तो पैसेवाला होता. जेव्हा लोकांना या व्यक्तीचे वास्तव समजले, तेव्हा सर्वजण चक्रावून गेले. त्याची अवस्था पाहून कोणालाही विश्वास बसत नव्हता.


प्रत्यक्षात हा भिकारी बनलेली व्यक्ती गुजरात प्रांतातील रहिवासी आहे. नऊवारी जिल्ह्यातील बँक व्यवस्थापक म्हणून तो सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी महाव्यवस्थापकपदही भूषवले आहे. भिकारी बनलेला हा माणूस रोडवेज बसस्थानकाजवळ अनेकदा फिरताना दिसत होता. दरम्यान, कोणीतरी त्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला.


रविवारी सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांना या भिकाऱ्याचं सत्य समोर आलं.


शहरापासून 1300 किमी अंतरावर असलेल्या गुजरात प्रांतातील नवसारी पोलीस स्टेशन चिखली जिल्ह्यातील रानवेरी गावात राहणारा दिनेश कुमार उर्फ​दिनू भाई पटेल एप्रिल महिन्यापासून घरातून बेपत्ता होते. ज्याची चिखली पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट आहे.


खरंतर मानसिक संतुलन बिघडल्यामुळे दिनेश कुमारची अशी अवस्था झाली होती. त्यांची माहिती मिळताच त्यांना कोतवालीनगर पोलिसांकडे नेण्यात आले.


ही माहिती पोलिसांनी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील रानबेरी गावात कुटुंबीयांना दिली. दिनेश पटेलची माहिती मिळताच गुजरातमधील कुटुंबीय त्याला घेण्यासाठी एटाला रवाना झाले आहेत. खरे तर ते बँक मॅनेजर ते जनरल मॅनेजर या पदावर काम करून 2009 साली निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते गरीब नाहीत, तर त्यांच्याकडे खूप पैसे आहेत.