अहमदाबाद: काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांची राजकारणाच्या मैदानातील एन्ट्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. त्यांच्या प्रत्येक कृती आणि वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असते. मात्र, तरीही प्रियंका यांनी आपल्या पहिल्या जाहीर भाषणात जाणीवपूर्वक केलेली एक गोष्ट अनेकांच्या ध्यानात आली नाही. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'मेरी बहनो और मेरे भाइयो', अशा शब्दांत केली. एरवी प्रचलित पद्धतीनुसार पुरुषांचा उल्लेख प्रथम केला जातो. मात्र, प्रियंका यांनी प्रथम स्त्रियांचा उल्लेख करून लक्ष वेधून घेतले आहे. सुरुवातीला अनेकांनी ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र, काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी हा व्हीडिओ ट्विट केल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रियंकांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे सुष्मिता देव यांनी हा व्हीडिओ ट्विट केल्यानंतर प्रियंका यांनी त्यावर कमेंट केली. मला वाटलं, ही गोष्ट कोणच्याही ध्यानात आली नाही. त्यावर सुष्मिता यांनी म्हटले की, ही खूपच उत्तम कृती होती. 


देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक- प्रियंका गांधी


यापूर्वी प्रियंका केवळ अमेठी आणि रायबरेली या गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये प्रचार करायच्या. मात्र, यावेळी त्यांच्याकडे थेट पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसची ही खेळी कितपत यशस्वी ठरते, यावर उत्तर प्रदेशचे राजकारण अवलंबून आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि प्रियंका यांच्यात असलेल्या सार्धम्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी आकर्षण वाटते. याचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो. तसेच प्रियंका उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळवतील, असाही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.