ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपकडून मोठी भेट
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा (Mamata Banerjee) पराभव करणार्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.
मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा (Mamata Banerjee) पराभव करणार्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. सुवेंदू यांची राजकीय भूमिका भारतीय जनता पक्षासाठी चांगली ठरली आहे. त्यामुळे भाजपने त्यांना विरोधी पक्ष नेत्याची मोठी जबाबदारी दिली आहे.
सुवेंदू अधिकारी विधानसभेत विरोधी पक्षनेते
भारतीय जनता पक्षाने सुवेंदू अधिकारी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुवेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, सुवेंदू यांना संधी देत पक्षाने मोठी जबाबदारी दिली. (Bengal BJP made Suvendu Adhikari the Leader of the Opposition, defeated Mamata Banerjee in the West Bengal Assembly Election)
सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा केला पराभव
सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक लढाईत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सुवेंदूअधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना 1956 मतांनी पराभूत केले. निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांना एकूण 109673 मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना 107937 मते मिळाली.
भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांपैकी 292 जागांवर 8 टप्प्यात मतदान झाले. 2 मे रोजी भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत 77 जागा जिंकल्या, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केवळ तीन जागा जिंकल्या. त्याचवेळी तृणमूल कॉंग्रेसने (TMC) 213 जागा जिंकल्या आणि बहुमत मिळवले. त्याचवेळी डाव्या आणि इतरांना 1-1 जागा मिळाली आहे. दोन मतदारसंघात उमेदवारांच्या मृत्यूमुळे निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या आणि त्या जागांवर 16 मे रोजी मतदान होणार आहे.